-
अभिनेत्री आणि व्हिडीओ ब्लॉगर उर्मिला निंबाळकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
उर्मिला व सुकीर्त गुमस्ते यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
-
३ ऑगस्ट रोजी उर्मिलाने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला.
-
उर्मिलाने आपल्या बाळासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
बाळाचं नाव अथांग असं ठेवलं आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
अथांगचे क्यूट फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
उर्मिलाने खऱ्या अर्थाने तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय केल्याचं म्हटलं जातं.
-
उर्मिलाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
-
उर्मिलाने तिच्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
‘दुहेरी’ ही उर्मिलाची मालिका विशेष गाजली होती.
-
उर्मिलाने ‘दिया और बाती हम’, ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकांमध्येही काम केले आहे.
-
उर्मिला कोणत्याही गोष्टीवर असलेलं तीच मत ती अगदी स्पष्टपणे मांडत असते.
-
उर्मिलाला तिच्या या स्वभावामुळे अनेकदा वाईट प्रतिक्रियांचा आणि ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्मिला निंबाळकर / इन्स्टाग्राम)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश