-
झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे.
-
पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय.
-
कारण दोन भागांची सांगड घालून मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात आहेत.
-
नाईकांच्या वाडयातल्या शुभ कार्यापासून झालेली मालिका वाड्यात वावरणाऱ्या अण्णा शेवंतांच्या अतृप्त आत्म्या पर्यंत येऊन पाहोचली आहे.
-
या मालिकेतील ‘शेवंता’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
-
अपूर्वा नेमळेकर छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात ‘शेवंता’ हे पात्र सर्वांचेच मुख्य आकर्षण ठरले होते.
-
अपूर्वा नेमळेकरने मालिका का सोडली याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.
-
अपूर्वाच्या जागी आता अभिनेत्री कृतिका तुळसकर ही ‘शेवतां’ची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
कृतिकाने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
-
सध्या या मालिकेत प्रेक्षकांचे आणखी एका आवडत्या पात्राची एन्ट्री झाली आहे.
-
या मालिकेत वच्छी हे पात्र साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील ही सध्या अगदी नव्या लूकमध्ये दिसत आहे.
-
आता ‘रात्रीस खेळ चाले ३’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.
-
गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश