-
‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेला तुफान प्रतिसाद मिळतोय.
-
या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे.
-
पहिल्या २ पर्वांप्रमाणेच तिसऱ्या पर्वावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
-
पण सध्या मालिकेत शेवंता या लोकप्रिय व्यक्तिरेखेच्या जागी एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.
-
मालिकेत सध्या अभिनेत्री कृतिका तुळसकर ही शेवंताची भूमिका साकारणार आहे.
-
कृतिका गेली १८ वर्षात थिएटर माध्यमात कार्यरत असून तिने अनेक नाटक आणि चित्रपटात काम केलं आहे.
-
कृतिका एक उत्तम नृत्यांगना आहे.
-
कृतिका कथ्थक विशारद आहे.
-
प्रोफेशनली सायकॉलॉजिस्ट असलेली कृतिका आपली आवड जोपासण्यासाठी अभिनय क्षेत्राकडे वळली.
-
शेवंताची भूमिका साकारणे हा तिच्या अभिनय क्षेत्रामधील कारकिर्दीतला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असून त्याविषयी बोलताना कृतिका म्हणाली.
-
‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका आणि त्यातील पात्र ही खूप लोकप्रिय असून प्रेक्षक त्यावर खूप प्रेम करतात.
-
शेवंता ही भूमिका माझ्या वाट्याला आली असली तरी त्या भूमिकेच्या लोकप्रियतेकडे पाहता ही भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी आहे.
-
मी अशा करते की प्रेक्षकांना माझं काम आवडेल आणि ते मला शेवंता म्हणून स्वीकारतील.
-
नवीन शेवंताला प्रेक्षकांकडून नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही.
-
सध्या मालिकेत अजून एका नवीन व्यक्तिरेखेच्या एन्ट्रीमुळे मालिका रंजक वळणावर आली आहे.
-
वच्छी हे पात्र पुन्हा एकदा मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत असून ती एका नवीन लुक मध्ये दिसतेय.
-
आता या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढवली आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य : कृतिका तुळसकर / इन्स्टाग्राम)
स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार