-
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री काडगावकर अल्पावधीत घराघरात प्रसिद्ध झाली.
-
धनश्री सर्वत्र ‘वहिनीसाहेब’ याच नावाने खासकरुन ओळखली जाते.
-
धनश्रीने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
-
धनश्रीच्या आयुष्यातील इतर आनंदी क्षणांप्रमाणेच तिने ही गोड बातमीही सोशल मीडियावरून चाहत्यांसाठी शेअर केली होती.
-
सध्या धनश्री तिच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे.
-
धनश्रीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.
-
या फोटोमध्ये धनश्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
-
अतिशय साध्या मेकअपमध्येसुद्धा धनश्री खूप सुंदर दिसत आहे.
-
बाळंतपणानंतर धनश्रीने फिटनेसकडे जास्त लक्ष दिल्याचं या फोटोंमधून सहज स्पष्ट होत आहे.
-
धनश्रीचा आणखी एक खास अंदाज.
-
धनश्रीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहे.
-
धनश्रीचा नवा लूक चाहत्यांना भावला असून या फोटोवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
गरोदर असतानाही धनश्रीने बऱ्याचदा बेबी बंपमधील फोटो शेअर केले होते.
-
धनश्रीने यापूर्वी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकांमध्येही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनश्री काडगावकर / इन्स्टाग्राम)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश