-
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हे नाव चाहत्यांसाठी आता नवीन राहिलेलं नाही.
-
अभिनयासोबतच कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेदेखील कायम चर्चेत असते.
-
सध्या अनेक अभिनेत्रींनी साड्यांना त्यांची पसंती दिली आहे.
-
त्यामुळेच की काय साडी हा सध्याचा फॅशन ट्रेंड बनलाय.
-
कंगना अनेक कार्यक्रमांमध्ये साडी नेसण्यास प्राधान्य देते.
-
हा फॅशन ट्रेंड केवळ साडीपुरता मर्यादित नाही, तर ब्लाऊजच्याही असंख्य व्हरायटी आता पाहायला मिळतात.
-
साड्यांपेक्षाही अधिक स्टायलिश सध्या ब्लाऊजच असतात.
-
पठणी, कांजीवरम, सिल्क अशा नेहमीच्या पारंपरिक साड्यांना अशा हटके ब्लाऊजमुळे वेगळा लूक मिळतो.
-
शिफॉन, जॉर्जेटच्या साड्यांवरही डिझायनर ब्लाऊज घातले, तर सुंदर कॅज्युअल लूक मिळतो.
-
ब्लाऊजचे अनेक प्रकार आता पाहायला मिळतात.
-
मिक्स अँड मॅच करून असे ब्लाऊज सहजपणे अनेक साड्यांवर घालता येतात.
-
फॅशनेबली क्लासी दिसण्यासाठी साडी कशी नेसताय हे महत्त्वाचं, पण त्याबरोबरच ब्लाऊजची फॅशनही तितकीच महत्त्वाची ठरतेय.
-
या लूकमध्ये कंगना सुंदर दिसत आहे.
-
ब्लाऊजमध्ये इतकं वैविध्य आलंय की, एकाच साडीवर चार वेगवेगळी ब्लाऊज घालून तुम्ही चार वेगळे लुक निश्चित मिळवू शकता.
-
कंगनाचा बहुप्रतिक्षित ‘थलायवी’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
-
फक्त भारतात नव्हे तर जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.
-
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कंगना रणौत / इन्स्टाग्राम)
Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम