-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘अजुनही बरसात आहे’ ह्या मालिकेनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलंय.
-
डॉ. मीरा आणि डॉ. आदिराज अर्थातच मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.
-
अनेक वर्षांनंतर अचानक भेटलेले हे दोघं आणि मग त्यांची पुन्हा सुरू झालेली प्रेमकहाणी आता लग्नाचं रूप घेणार आहे.
-
कॉलेजमध्ये असताना मीरा आणि आदिराज यांची भेट एका प्रसंगात अचानक होते.
-
भेटीचं रूपांतर मैत्रीत आणि कालांतराने प्रेमात होतं.
-
पण काही कारणानी त्यांचं ब्रेकअप होतं आणि १० वर्षांनंतर ते पुन्हा भेटतात.
-
पुन्हा भेटल्यावर त्यांच्यात सातत्याने वाद होतात.
-
आदिराजचा भाचा मल्हार आणि मीराची बहीण मनस्विनी यांच्या प्रेमकहाणीमुळे आदिराज आणि मीरा यांना एकमेकांशी बोलून त्या दोघांना मदत करणं भाग पडतं.
-
या सगळ्यांत त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मनातलं प्रेम ओठांवर येतं.
-
आदिराज आणि मीरा त्यांचं प्रेम एकमेकांकडे व्यक्तं करतात आणि आता लवकरच ते कायमचे एकमेकांचे होणार आहेत.
-
प्रेक्षकांना ही प्रेमकहाणी आवडते आहे आणि ते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते, त्या मीरा आणि आदिराज यांचं लग्न लवकरच पार पडणार आहे.
-
अनेक संकटं, दुरावा, भांडणं या सगळ्यावर मात करून हा विवाह सोहळा येत्या ३० नोव्हेंबर रोजी सोनी मराठी वाहिनीवर संपन्न होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल