-
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘लागिरं झालं जी’.
-
या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असला तरीदेखील त्यातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत.
-
त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री पूर्वा शिंदे.
-
या मालिकेत पूर्वाने जयडी ही भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.
-
पूर्वाने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
पूर्वा केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक सुंदर नृत्यांगनादेखील आहे.
-
झी युवा वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या शोमध्ये ती सहभागी झाली होती.
-
पूर्वाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
-
हे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंवर पोस्ट केले आहेत.
-
मालिकेत साध्या वेशात वावरणारी पूर्वा खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात वावरते.
-
पूर्वाचा आणखी एक खास अंदाज.
-
या मोहक अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
-
पूर्वाच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
-
सध्या पूर्वा ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूर्वा शिंदे / इन्स्टाग्राम)

स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार