-
‘पांडू’ हा निखळ विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा ‘पांडू’ हा चित्रपट चर्चेत आहे.
-
मराठी सिनेसृष्टीत विनोदी चित्रपटांची एक मोठी परंपरा आहे.
-
या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
-
या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी डॅशिंग गर्ल उषा केळेवाली ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
-
सोनाली पहिल्यांदाच एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
-
बहुरंगी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या गेलेल्या अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘पांडू हवालदार’ या चित्रपटातील गाजलेली ही व्यक्तिरेखा भाऊंनी साकारली आहे.
-
नव्या पिढीला दादांची, त्यांच्या चित्रपटांची ओळख करून देण्याचा प्रयत्न म्हणजे ‘पांडू’, असं भाऊ सांगतात.
-
‘पांडू’ या चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची.
-
या चित्रपटात भाऊ कदम हे पांडूच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर कुशल बद्रिके महादूच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
अवधूत गुप्ते यांच्या संगिताने सजलेल्या पांडूची गाणी सर्वत्र लोकप्रिय झालेली आहेत.
-
या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
-
‘पांडू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे.
-
हा चित्रपट ३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल