-
‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘फू बाई फू’ आणि ‘कॉमेडीची जीएसटी’ या कार्यक्रमांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता हनमघर.
-
प्राजक्ताच्या विनोदी अंदाजाने आणि अनोख्या अभिनय कौशल्याने आजवर प्रेक्षकांचं बरंच मनोरंजन केलं आहे.
-
प्राजक्ता लवकरच आई होणार आहे.
-
प्राजक्ताच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
-
काही दिवसापूर्वीच तिच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला.
-
या सोहळ्याचे फोटो प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
प्राजक्तावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
२०१७ मध्ये रजत ढाळेसोबत प्राजक्ताने लग्न केले.
-
रजत मुळचा धुळ्याचा असून, सध्याच्या घडीला पुण्यात एका प्रतिष्ठित कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे.
-
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील प्राजक्ताची भूमिका विशेष गाजली होती.
-
विनोदाचं टायमिंग, अफलातून संवादकौशल्य आणि अभिनय शैली या गोष्टींमुळे प्राजक्ता ओळखली जाते.
-
नऊवारी साडीपासून ते अगदी सर्वसामान्य महिलेच्या भूमिकेतही ती प्रभावीपणे आपली कला सादर करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता हनमघर / इन्स्टाग्राम)

‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल