-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणारा विनोदी कलाकार म्हणजे ‘दादूस’ उर्फ लोकप्रिय अभिनेते अरुण कदम.
-
नुकताच अरुण कदम यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला आहे.
-
अरुण यांची मुलगी सुकन्या कदमचा ऑगस्ट महिन्यात साखरपुडा झाला होता.
-
२५ नोव्हेंबर रोजी सुकन्याने बॉयफ्रेंड सागर पावळेसोबत रजिस्टर पद्धतीने लग्न केले.
-
या लग्न सोहळ्याचे कुटुंबातील काही जवळच्या व्यक्ती आणि मोजक्याच मित्रपरिवाला आमंत्रण दिल्याचे म्हटले जात आहे.
-
सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे.
-
अरुण कदम यांची मुलगी सुकन्या ही कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आहे.
-
सुकन्याने भरतनाट्यमचे धडे देखील गिरवले आहेत.
-
लॉकडाउनच्या काळात तिने वडिलांसोबत अनेक टिकटॉक व्हिडीओ केले होते आणि ते व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडले होते.
-
सध्या सुकन्या ही एका कंपनीमध्ये ग्राफिक डिझायनरचे काम करते.
-
सुकन्याचा पती सागर ब्रीविंग कन्सल्टंट म्हणून काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुकन्या कदम / इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल