-
मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या सुमधूर आवाजाने साऱ्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे शाल्मली खोलगडे.
-
आज कला क्षेत्रामध्ये शाल्मलीने स्वत:च भक्कम स्थान निर्माण केलं आहे.
-
कुठल्याही पट्टीत तितक्याच ताकदीनं गाण्याची कसब अंगात असलेली शाल्मली आद जगभरात प्रसिद्ध आहे.
-
बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींना तिने आपला आवाज दिला आहे.
-
शाल्मलीने बॉयफ्रेण्ड फरहान शेखसोबत लग्नगाठ बांधली.
-
या दोघांनी सोमवारी २२ नोव्हेंबरला लग्नगाठ बांधली.
-
या दोघांच्या विवाहाची अचानक आलेली वार्ता त्यांच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का ठरली आहे.
-
शाल्मली आणि फरहान बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते.
-
१५ पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.
-
शाल्मलीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
शाल्मली आणि फरहानवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शाल्मली खोलगडे / इन्स्टाग्राम)

‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल