-
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
-
सध्या सलमान खान आणि चित्रपटाची संपूर्ण टीम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
-
‘अंतिम’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतंच सलमान खानने अहमदाबादमध्ये हजेरी लावली.
-
‘अंतिम’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने काल साबरमती येथील महात्मा गांधी आश्रमाला भेट दिली.
-
यावेळी सलमानने हिरव्या रंगाचे टीशर्ट आणि जिन्स परिधान केली होती. यात तो फार स्मार्ट दिसत होता.
-
सलमानने चरखा कसा काम करतो? याची संपूर्ण माहिती घेतली.
तसेच सलमानने चरखा फिरवून सूत निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. -
यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे.
-
दरम्यान सलमानचा ‘अंतिम’ हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.
-
या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. सलमान या चित्रपटात सरदार पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे.
-
तर आयुष एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट मराठी ‘मुळशीपॅटर्न’ चित्रपटाचा रिमेक आहे. (सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेस)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल