-
कतरिना आणि विकी कौशलच्या (Katrina Kaif Vicky Kaushal Wedding) लग्नाची बरीच चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचा राजस्थानमध्ये विवाहसोहळा पार पाडणार आहेत. मात्र, विकी आणि कतरिनाकडून त्यांच्या लग्नाबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. (Photo: Indian Express)
-
लग्नात आमंत्रित पाहुण्यांसमोर अनेक प्रकारच्या अटी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, लग्नात उपस्थित असलेल्या पाहुण्यांसमोर ठेवलेल्या अटींमध्ये फोटोग्राफीवर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच लोकेशन शेअरिंगसह फोनवरही बंदी घालण्यात आली आहे. (Photo: Indian Express)
-
अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबत लग्न केले आहे. दोघांच्या लग्नात लग्नाचे फोटो बाहेर जाऊ नयेत म्हणून पाहुण्यांना फोनवर बंदी घालण्यात आली होती. (virat kohli / Insatgram )
-
प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत लग्न केले आहे. दोघांच्या लग्नात कार्यक्रमस्थळी कॅमेऱ्यावाले मोबाईल फोन आणण्यास मनाई करण्यात आली होती. कार्यक्रमस्थळावरील सर्व कर्मचार्यांनी नेहमी त्यांचे ओळखपत्र परिधान करणे आवश्यक होते. (SabyasachiOfficial/Instagram)
-
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नात पाहुण्यांना फोन बॅन करण्यात आला होता. (Photo: Indian Express)
-
वरुण धवनने २०२१ मध्ये नताशा दलालशी लग्न केले. दोघांच्या लग्नाला आलेल्या पाहुण्यांची कोराना चाचणी घेणे आवश्यक होते. लग्नात, पाहुण्यांना जोडप्याचे फोटो काढू नका असे सांगण्यात आले. (Photo: Shashank Khaitan/Instagram)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल