-
प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला विराम देत १९ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात ‘झिम्मा’ प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचे सर्व शोज हाऊसफुल्ल जात आहेत.
-
विकएंडला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले होते.
-
‘झिम्मा’च्या या घवघवीत यशाचा आनंद साजरा करण्यात आला.
-
या पार्टीत ‘झिम्मा’ चित्रपटातील सर्व स्टारकास्ट आणि युनिट मेम्बर्सचा सत्कार करण्यात आला.
-
या चित्रपटात मुख्य भूमिकेत सात बायका आणि एक पुरुष आहे.
-
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
‘झिम्मा’ या चित्रपटात ७ वेगवेगळ्या वयोगटातील महिला आहेत.
-
या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे.
-
क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
-
या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसर चांगली कमाई केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल