-
सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक लोकप्रिय जोड्यांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत.
-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
अंकिताच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
-
अंकिता प्रियकर विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
-
याचे काही फोटो अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
-
दोघांनी जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली होती.
-
ईटाईम्सच्या वृत्तानुसार अंकिता आणि विक्की १२, १३ आणि १४ डिसेंबरला लग्न बंधनात अडकणार आहेत.
-
त्या दोघांनीही कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला लग्नाचे आमंत्रण दिले असल्याचे म्हटले जात आहे.
-
अंकिताने मालिकांसोबतच काही चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
अंकिता सध्या पवित्र रिश्ता या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे / इन्स्टाग्राम)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का