-
झी मराठीवर सुरू असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेली आहे.
-
या मालिकेमध्ये अनेक वर्षानंतर अभिनेता श्रेयस तळपदे हा दिसत आहे.
-
श्रेयस तळपदे या मालिकेमध्ये यशची भूमिका अत्यंत चोख बजावतोय.
-
तसेच या मालिकेमध्ये त्याच्यासोबत प्रार्थना बेहरे नेहा कामत ही भूमिका साकारताना दिसतेय.
-
मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज असताना मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे ती चिमुरडी बाल कलाकार मायरा वायकुळ.
-
मायरा हीने या मालिकेत परीची भूमिका साकारली आहे.
-
मायरा ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय आहे.
-
मायरा सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.
-
मायराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यात ती अभिनयाची प्रॅक्टीस करताना दिसत आहे, तर याबाबतच अनेकांनी तिला प्रश्न विचारले होते, तर मायरा हिला ज्या वेळेस शुट करायचा असतो, त्यावेळेस ती अनेकांची मदत घेते.
-
सुरुवातीला मालिकेचे दिग्दर्शक मायराला तीचा सीन काय आहे, ते समजून सांगतात.
-
त्यानंतर तिला प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे हे देखील तिचा सीन समजावून सांगण्यास मदत करतात.
-
त्यानंतर ती आपल्याला काय डायलॉग म्हणायचे आहेत, ते आत्मसात करते.
-
त्यानंतर मायरा अतिशय व्यवस्थित रित्या डायलॉग डिलिव्हरी करते.
-
मायराच्या निरागस अभिनयाने तिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ / इन्स्टाग्राम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल