-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
अंकिता लवकरच प्रियकर विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अंकिताच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती.
-
सध्या अंकिता ही तिच्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना लग्नपत्रिका वाटण्यात व्यस्त आहे.
-
नुकतीच अंकिता आणि विकी यांनी जोडीने जाऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
-
यावेळी त्यांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन लग्नाची पत्रिका दिली. ‘लग्नाला आठवणीने या’, अशी विनंती देखील तिने राज्यपालांना केली.
-
याचे अनेक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
विशेष म्हणजे यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंकितासह विकीशी गप्पा मारल्या.
-
गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
-
अंकिता आणि विकी येत्या १२, १३ आणि १४ डिसेंबरला लग्न बंधनात अडकणार आहेत.
-
अंकिता सध्या पवित्र रिश्ता या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल