-
Sunny Deol Actresses Divorce: अभिनेता सनी देओलने राजकारणात उडी घेतली आणि सध्या ते खासदार देखील आहेत. मात्र, ते एकेकाळचे सुपरस्टार आहेत. त्यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलंय. मात्र, त्यांच्यासोबत काम केलेल्या काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांचा खऱ्या आयुष्यात घटस्फोट झाला आहे. अशाच अभिनेत्रींचा हा आढावा.
-
अभिनेत्री सोनमने सनी देओलसोबत त्रिदेव चित्रपटात काम केलं होतं. २०१५ मध्ये सोनमने पती राजीव रायशी घटस्फोट घेतला होता.
-
अभिनेत्री फराहने सनी देओलसोबत यतीम चित्रपटात काम केलं होतं. फराहने बिंदु दारा सिंहसोबत लग्न केलं होतं. मात्र, नंतर त्यांचा घटस्फोट झाला.
-
अभिनेत्री अमृता सिंहने बेताब चित्रपटात सनी देओलसोबत काम केलं. अमृताचं अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न झालं, मात्र नंतर दोघांमध्ये घटस्फोटही झाला.
-
अभिनेत्री करिश्मा कपूरने सनी देओलसोबत जीत आणि अजय सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. व्यक्तिगत आयुष्यात करिश्मा कपूरने लग्नानंतर काही काळाने पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला.
-
अभिनेत्री जया प्रदाने श्रीकांत नाहटासोबत लग्न केलं होतं. मात्र, नंतर ते दोघेही वेगळे झाले. जया प्रदा यांनी सनी देओलसोबत जबरदस्त, वीरता आणि मजबूर या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
-
अर्चना पूरन सिंह यांनी सनी देओलसोबत ‘आग का गोला और रोक सको तो रोक लो’ या चित्रपटात काम केलं होतं. व्यक्तिगत आयुष्यात अर्चना सिंह यांनी पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेतला आणि परमीत सेठी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.

पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त