-
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका साऱ्यांनाच ठावूक असेल.
-
मालिकेतील राणादा आणि अंजली बाई यांच्या उत्तम अभिनयामुळे आणि केमिस्ट्रीमुळे ही मालिका लोकप्रिय झाली आहे.
-
मालिकेत अंजलीबाई ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षया देवधरचा एक स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
-
झी मराठीने नेहमीच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील गोष्टी, कथा, परंपरा, संस्कृतीचा ठसा जगभरातील मराठी मनावर उमटवलेला आहे.
-
महाराष्ट्राला विनोदी पात्र साकारण्याची परंपरा खूप मोठी आहे. अगदी संत एकनाथ महाराजांच्या भारूडापासून ते बुरगुंडा पर्यंत, किंवा प्र. के अत्रे, पु ल. देशपांडे ते वऱ्हाडकार डॉ. लक्ष्मण देशपांडे पर्यंत.
-
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी अशा एकपात्री व्यक्तिरेखा साकारत असतात जसे की चौकात, नाक्यावर, कट्यावर, चहाच्या टपरीवर, मित्रांसोबत, समारंभात आणि ह्या गोष्टी अगदी मसाला लावून रंगवून सांगितल्या जातात.
-
अशाच काही सेलेब्रिटींच्या आयुष्यातील गोष्टी ज्या सामान्य लोकांना माहिती नाहीत अश्या गोष्टींच्या किस्स्यांचा फड झी मराठी वर रंगणार आहे.
-
अगदी शाहरुखपासून शरद केळकर पर्यंत, सुनील गावस्करपासून सुनील बर्वे पर्यंत.. त्यांच्या व्हॅनिटीतील, नाटकाच्या विंगेतील, नाटक सिनेमाच्या गल्ल्यापासून ते लग्नापर्यंत.
-
अश्याच अतरंगी किस्स्यांची मैफिल रंगणार झी मराठी वर ज्यामध्ये विशेष अतिथी म्हणून असतील सिद्धार्थ जाधव आणि ‘सैराट’ फेम तानाजी गलगुंड.
-
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम पाठक बाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर प्रथमच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
-
सोबतच अनेक सरप्राइझेस ह्या शो च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतील.
-
‘हे तर काहीच नाय!’ १० डिसेंबर पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९:३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर / इन्स्टाग्राम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल