-
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचीच चर्चा जोरदार सुरू होती. आता ही चर्चा सत्यात उतरत आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अशी ओळख बनलेली ही जोडी या आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विकी आणि कतरिना यांच्या विवाहाची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तर विवाहाच्या चर्चा सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर सलमान खानवर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. पाहूयात काही मीम्स…
-
विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्यापासून नेटकरी सलमान खानवर मीम्स बनवताना दिसत आहे.
-
सलमानच्याच चित्रपटातील सीनचा वापर करून नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसताहेत.
-
सलमान आणि कतरिना या दोघांचा काही वर्षांपूर्वी अफेअर असल्याच्या चर्चा होत्या.
-
त्यावरून सलमानवर मीम्स शेअर केले जात आहेत.
-
विकी आणि कतरिनाने सलमानला लग्नासाठी आमंत्रित केलं नाही, अशाही चर्चा मध्यंतरी होत्या.
-
त्यावरूनही नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स तयार केले आहेत.
-
कतरिनाला बॉलिवूडमध्ये सलमानने लाँच केले होते, त्यावरून हे मीम तयार करण्यात आलंय.
-
कतरिना लग्न करत असल्याने सलमान खान दुःखी असल्याचे मीम्स नेटकऱ्यांनी तयार केले आहेत.
-
तर, काही नेटकऱ्यांनी विकी-कतरिनाच्या लग्नाच्या चर्चा पाहून सलमानची काय प्रतिक्रिया असेल, असे मीम्स तयार केले आहेत.
-
हे मीम सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
-
दरम्यान, रणबीर कपूर आणि कतरिना हे दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. त्यावरून रणबीरला देखील ट्रोल केलं जातंय.
-
विकी-कतरिनाच्या लग्नात जाण्यासाठी सलमान काय करणार, याबाबतही भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
-
रणबीर आणि सलमान दोघांनाही कतरिनाच्या लग्नावरून नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.
-
सलमानच्या तेरे नाम चित्रपटातील गाण्याचा वापर करून त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे.
-
(सर्व मीम्स सोशल मीडियावरून साभार)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच