-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच विवाहबंधनांत अडकणार आहेत. या दोघांच्या वयात पाच वर्षांचं अंतर आहे. कतरिना ३८ वर्षांची असून विकी ३३ वर्षांचा आहे.
-
अभिनेत्री सोहा अली खान ही अभिनेता कुणाल खेमूपेक्षा वयाने चार वर्षांनी मोठी आहे.
-
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. प्रियांका ३९ वर्षांची तर निक २९ वर्षांचा आहे.
-
बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीपेक्षा अभिनेत्री नेहा धुपिया दोन वर्षांनी मोठी आहे. नेहाचं वय ४१ तर अंगदचं वय ३८ वर्षे आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ४८ वर्षांची असून अभिनेता अभिषेक बच्चन ४५ वर्षांचा आहे. ऐश्वर्या ही अभिषेकपेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठी आहे.
-
प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग या दोघांच्या वयात सात वर्षांचं अंतर आहे. नेहा ३३ वर्षांची असून रोहनप्रीत २६ वर्षांचा आहे.
-
बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर मीर यांच्यातही दहा वर्षांचं अंतर आहे.
-
अभिनेता करण सिंह ग्रोवरपेक्षा अभिनेत्री बिपाशा बासू चार वर्षांनी मोठी आहे. बिपाशा ४२ वर्षांची तर करण ३९ वर्षांचा आहे.
-
कोरिओग्राफर फराह खानचं वय ५६ वर्षे असून तिचा पती शिरीश कुंदर ४८ वर्षांचा आहे.
-
अभिनेत्री अर्चना पुरण सिंग आणि परमीत सेठी यांच्या वयात सात वर्षांचं अंतर आहे.
-
अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने वयाने पाच वर्षांनी लहान चैतन्य शर्माशी लग्न केलं.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल