-
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. सध्या विवेक सिनेसृष्टीपासून दूर असला तरी त्याचा बॉलिवूडमधील संपूर्ण प्रवास फार खडतर होता.
-
मात्र काही वर्षांपूर्वी त्याने चित्रपटसृष्टीत काम करणे बंद केले. विशेष म्हणजे त्याच्या या निर्णयचा त्याला कोणताही पश्चात्ताप होत नाही, असे तो अनेकदा सांगतो.
-
नुकतंच विवेक ‘इनसाइड एज’ या वेबसीरिजमध्ये झळकला होता. यानतंर त्याने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडमधील काही कलाकारांविरुद्ध ताशेरे ओढले आहेत.
-
विवेक ओबेरॉयने नुकतंच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल सांगितले.
-
बॉलिवूडमध्ये येताना त्याला किती चढ-उतारांचा सामना करावा लागला, याबाबतही त्याने मनमोकळेपणाने भाष्य केले.
-
“मला बॉलिवूडबाबत कोणतीही तक्रार नाही. मात्र सिनेसृष्टीला एखाद्या शाळेप्रमाणे अजिबात विकसित केले जात नाही.” असे त्याने सांगितले.
-
या ठिकाणी टॅलेंटला फार कमी वाव दिला जातो. या ठिकाणी स्वत:ला टिकवून ठेवणे फार कठीण असते.” असेही विवेक म्हणाला.
-
“बॉलिवूड हा एक खास क्लब आहे, जिथे एकतर तुमचे आडनाव असायला हवे किंवा तुम्ही त्या संबंधित लॉबीचा भाग असायला हवा,” असे विवेकने सांगितले.
-
“बॉलिवूडमध्ये फक्त याच गोष्टींची किंमत असते. या ठिकाणी तुमचे टॅलेंट काहीही महत्त्वाचे नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असेही तो म्हणाला.
-
यापुढे विवेक म्हणाला की, “नवीन कलागुणांना पुढे आणण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी सर्व प्रयत्न करत आहे.”
-
तसेच ‘इनसाइड एज’ या वेब सीरिजबद्दल बोलताना तो म्हणाला की, “ऋचा खूप चांगली कलाकार आहे. तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.”
-
विवेकने २००२ मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
-
त्यानंतर विवेकने ‘काल’, ‘मस्ती’, ‘प्रिन्स’ ‘साथिया’, ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’, ‘ओमकारा’, अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
आज विवेक चित्रपटांपासून लांब असला तरी त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल