-
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे.
-
या चर्चा जॅकलिनचा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतचा फोटो व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या.
-
या फोटोवरुन जॅकलिन सुकेशला डेट करत असल्याचे म्हटले जात होते.
-
त्यानंतर जॅकलिनचा सुकेशसोबतचा आणखी एक रोमँटिक फोटो समोर आला होता.
-
हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
-
त्यानंतर सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिल्याचे समोर आले.
-
तसेच ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर देखील भेट म्हणून दिली होती.
-
पण जॅकलिनला एवढे महागडे गिफ्ट देणारा सुकेश चंद्रशेखर नक्की कोण आहे ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
-
सुकेश चंद्रशेखर बंगळुरुतला एक उद्योगपती आहे.
-
त्याने अनेकांची नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक केली होती.
-
७५ जणांचे १०० कोटी रुपये घेऊन तो फरार झाला होता.
-
निवडणूक आयोगात ओळख असल्याचे सांगून हवे ते चिन्ह मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले होते. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला २०१७ मध्ये अटक केली होती.
-
त्यानंतर आता दिल्लीच्या तिहार तुरुंगातून २०० कोटी रुपये वसूल केल्या प्रकरणी त्याला अटक झाली होती.
-
(All Photos: jacqueline fernandez Instagram)

पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग