-
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांची सध्या लगीनघाई सुरु आहे.
-
त्या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
अवघ्या दोन दिवसात राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाही थाटात ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
या दोघांचा विवाह राजस्थानमधील सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात होणार आहे.
-
हा विवाहसोहळा अलिशान आणि भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे.
-
हिंदू धर्मात विवाहादरम्यान मुहूर्त, वधू वराचे गुण जुळणे याला फार महत्त्व दिले जाते.
-
विवाहापूर्वी गुण मिलनाची पूर्वीपासून प्रचलित असलेली पद्धत अजूनही सुरु आहे.
-
दरम्यान येत्या ९ डिसेंबरला विकी-कतरिना विवाहबंधनात अडकणार आहे.
-
यानिमित्ताने अनेक ज्योतिषांनी त्यांचे किती गुण जुळले असतील? याचा अंदाज लावला आहे.
-
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कतरिना-विकी येत्या ९ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. यावेळी चंद्र हा कुंभ राशीतून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
-
कतरिना कैफचा जन्म हा १६ जुलै १९८४ रोजी संध्याकाळी ६.४५ रोजी हाँगकाँगमध्ये झाला.
-
तिच्या जन्मपत्रिकेनुसार तिची लग्न रास ही धनू आहे. तर चंद्र हा शनीसोबत कुंभ राशीत स्थित आहे.
-
तर दुसरीकडे विकीचा जन्म हा १६ मे १९८८ रोजी झाला. त्याच्या जन्मपत्रिकेनुसार चंद्र हा वृषभ राशीसह सूर्य आणि बुध यांच्यात स्थित आहे.
-
या दोघांचीही पत्रिका लग्नासाठी उत्तम मानली जात आहे.
-
लग्नानंतर कतरिना आणि विकी कौशल यांचे वैवाहिक जीवन फार चांगले असणार आहे.
-
कतरिना आणि विकी कौशलचे 38 पैकी 32 गुण जुळत आहे. त्यामुळे हे लग्न शुभ मानले जात आहे, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल