-
‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते.
-
भारतात आणि भारताबाहेर शाहरुखचा तुफान चाहतावर्ग आहे. तो नेहमीच्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
-
शाहरुख खान उत्कृष्ट अभिनेत्यासोबतच एक उत्तम ‘फॅमिली मॅन’ म्हणूनही ओळखला जातो.
-
शाहरुख खान हा त्याच्या तिन्ही मुलांमध्ये सर्वात जास्त प्रेम हे त्याची मुलगी सुहानावर करतो. याबाबत त्याने अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे.
-
शाहरुखने सुहानाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी ठरवल्या आहेत. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे सुहानाचा बॉयफ्रेंड.
-
एकदा एका मुलाखतीत शाहरुख खानने सुहानाचा बॉयफ्रेंड किंवा त्याचा होणारा भावी जावई कसा असेल? त्यात कोणते गुण असणे गरजेचे आहे? याबद्दल भाष्य केले होते
-
एकदा एका मुलाखतीत बोलताना शाहरुख सुहानाच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना म्हणाला होता की, “त्याच्यात हे सात गुण असणे गरजेचे आहे.”
-
“माझ्या मुलीला डेट करण्यासाठी त्याला सात अटींचे पालन करावे लागेल.” असे शाहरुख खान म्हणाला.
-
एकदा शाहरुख करण जौहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये प्रमोशनसाठी गेला होता.
-
त्यावेळी शाहरुखसोबत आलिया भट्टही उपस्थित होती. यावेळी आलिया म्हणाली की, “माझा पहिला बॉयफ्रेंड वयाच्या १६ व्या वर्षी होता.”
-
‘तुझी मुलगी १६ वर्षांची आहे, जर एखाद्याने तुझ्या मुलीला किस केले तर तू त्या व्यक्तीला मारशील का? असा प्रश्न करणने शाहरुखला विचारला होता.
-
यावर शाहरुख संतापला आणि म्हणाला की, “मी त्याचे ओठ कापून टाकेन. शाहरुखचे हे बोलणे ऐकल्यानंतर “मला माहिती होते,” असे करण म्हणाला.
-
यापुढे शाहरुख म्हणाला, “१०० टक्के, फक्त एवढंच नाही, जर आर्यनने एखाद्या मुलीला किस केले तर मी त्याचेही ओठ कापून टाकेन.”
-
शाहरुख आणि गौरीने ८ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर १९९१ मध्ये लग्न केले.
-
शाहरुख आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. यापैकी आर्यन वयाने सर्वात मोठा असून अबराम आठ वर्षांचा आहे.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल