-
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ अखेर लग्न बंधनात अडकले आहेत.
-
९ डिसेंबर रोजी विकी-कतरिनाने आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली.
-
राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
या लग्नसोहळ्याला मोजक्यात पाहुण्यांना व मित्रमैत्रिणींना आमंत्रित करण्यात आलं होते.
-
विकी आणि कतरिनाने हळदी समारंभातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
विकीने हळदीच्या कार्यक्रमासाठी पांढरा कुर्ता परिधान केला होता. तर कतरिना पांढऱ्या लेंहग्यामध्ये दिसली.
-
हळदीच्या रंगात रंगली कतरिना…
-
हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
सोशल मीडियावर चाहत्यांकडून व सेलिब्रिटींकडून विकी व कतरिनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला.
-
पंजाबी पद्धतीने हा विवाह पार पडल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विकी कौशल आणि कतरिना कैफ / इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल