-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ३१ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटात मांडली आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती.
-
‘दे धक्का २’ हा चित्रपट १ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘दे धक्का’ हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता.
-
‘झोंबिवली’ या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर, अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हॉरर-कॉमेडी ‘झोबिंवली’ हा चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेले झोंबी आणि त्याविषयीची कथा याची उत्सुकता देखील वाढली आहे.
-
महाराष्ट्राची लाडकी सूनबाई म्हणून जिनिलिया देशमुखला ओळखले जाते. तब्बल १० वर्षांनी जिनिलिया पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. जिनिलिया पुन्हा पदार्पण करत असलेल्या मराठी चित्रपटाचे नाव ‘वेड’ असे आहे. १२ ऑगस्ट २०२२ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
-
महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासात कर्तृत्व गाजवणाऱ्या छत्रपती ताराराणींवर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट २०२२ च्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कदम यांचे असून राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
-
मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘लग्नकल्लोळ’ हा धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”