-
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध माती’चा मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
-
मालिकेत लवकरच अभिनेत्री तेजश्री प्रधानची एण्ट्री होणार आहे.
-
शिर्डीमधल्या आनंद जत्रेत अष्टपैलू व्यक्तिमत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
-
या स्पर्धेत कीर्ती सहभागी होणार असून या स्पर्धेचं सूत्रसंचालन तेजश्री प्रधान करणार आहे.
-
तेजश्री सेलिब्रिटी होस्ट म्हणून या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे.
-
या भूमिकेविषयी सांगताना तेजश्री प्रधान म्हणाली, फुलाला सुगंध मातीचा हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या मालिकेत मी तेजश्री प्रधान म्हणूनच एण्ट्री घेणार आहे.
-
खूप दिवसानंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करते आहे त्यामुळे उत्सुकता आहे.
-
मालिकेत मी एका अनोख्या स्पर्धेचं सूत्रसंचालन करणार आहे.
-
ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली आणि खास बात म्हणजे माझा या मालिकेतला लूक खूप विचारपूर्वक डिझाईन करण्यात आला आहे.
-
कीर्तीच्या प्रवासात तिला तेजश्री प्रधानची साथ कशी मिळणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.
-
शिर्डीमध्ये भरवण्यात आलेली अष्टपैलू व्यक्तिमत्व ही स्पर्धा कीर्तीसाठी अतिशय महत्त्वाची असून यानिमित्त्ताने तिच्या बुद्धीमत्तेची आणि हजरजबाबीपणाची कसोटी लागणार आहे.
-
कीर्ती ही स्पर्धा जिंकणार का? तेजश्री तिला कशी मदत करणार? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान / इन्स्टाग्राम)
असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! हायवेवर ओव्हरटेक करायला गेला अन् क्षणार्धात झाला कारचा चुरा, थरारक VIDEO व्हायरल