-
‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दिल दोस्ती दोबारा’ मालिकांतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर.
-
या मालिकेने आणि यातील कलाकारांनी सर्वच प्रेक्षकांना आपलंस केलं होतं.
-
आरती अंकलीकर-टिकेकर आणि उदय टिकेकर यांची कन्या स्वानंदी.
-
‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत स्वानंदी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली.
-
हटके अंदाजासाठी आणि तिने साकारलेल्या हरहुन्नरी व्यक्तिरेखेसाठी रसिकांच्या मनावर ठसा उमटवत स्वानंदीने तिचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे.
-
स्वानंदी सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गायनाच्या कार्यक्रमाचे स्वानंदीने विजेतेपद पटकावले.
-
घरातच गाण्याचे संस्कार मिळणाऱ्या स्वानंदीचा स्पर्धक ते विजेता हा प्रवास रोमांचकारी आहे.
-
स्वानंदीची आई आरती अंकलीकर टिकेकर या उत्कृष्ट शास्त्रीय गायिका आहेत.
-
सध्या स्वानंदी ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
-
चित्रीकरणातून वेळ काढत मी माझी संगीतसाधना सुरू ठेवणार असल्याचे स्वानंदी सांगते.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर / इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल