-
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. फक्त ऐश्वर्या नाही तर तिची लाडकी लेक आराध्यासुद्धा लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. आराध्या ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धीरुभाई अंबानी या इंटरनॅशनल या शाळेत शिकते.
-
या शाळेत करिश्मा कपूरसोबत अनेक सेलिब्रिटींची मुलं आराध्यासोबत या शाळेत शिकतात.
-
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरला दोन मुलं आहेत. तिचा मुलगा कियान आराध्यासोबत धीरुभाई अंबानी शाळेत शिकतो.
-
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लेक सुहाना देखील धीरूभाई अंबानी शाळेतून शिकली आहे.
-
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची लेक सारा अली खान देखील याच शाळेतून शिकली आहे.
-
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या दोन्ही मुली म्हणजेच जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या धीरूभाई अंबानी शाळेतून शिकल्या आहेत.
-
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला दोन मुलं आहेत. रेहान आणि रिदान अशी त्यांची नावं असून ते देखील याच शाळेत शिकतात.
-
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची धाकटी लेक आणि अनन्या पांडेची लहान बहिण रायसा पांडे ही पण याच शाळेत शिकते. (All Photo Credit : File Photo)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश