-
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’ मराठी.
-
अभिनेता विशाल निकम ठरला ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसर्या पर्वाचा विजेता.
-
‘बिग बॉस’ची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली.
-
खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची त्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे विशाल नेहेमीच चर्चेत राहिला.
-
विशालने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सर्व प्रेक्षकांचे आभार मानले.
-
विशाल म्हणाला, ‘रामकृष्ण हरी माऊली. मी आता हा व्हिडीओ कशासाठी केला सांगा पाहू, आई शप्पथ सांगतो विशालियन आणि माझ्यावर विशाल प्रेम करणारे तुम्ही लोक नसता तर आज हे मिळालं नसतं.’
-
‘खरंच मनापासून खूप खूप आभार. ही मिळालेली गोष्ट फक्त माझी नाहीय तर सर्व विशालियनची आहे. माझ्यावर विशाल प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षक माय माऊलींची आहे. हे तुमच्यासाठी….चांगभल,’ असे विशालने सांगितले.
-
‘तुमची साथ आणि माऊलींचा आशीर्वाद. सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. मी नेहमीप्रमाणे हेच म्हणेन की, आईशप्पथ सांगतो, तुम्ही होतात म्हणून मी इथवर आलो आणि आता ही ट्रॉफी हातात घेतली. या गावातून येणाऱ्या पोराला तुम्ही आज महाराष्ट्राचा फेव्हरेट केलाय, ‘बिग बॉस’ सिझन ३चा विजेता बनवलाय. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. ही तर फक्त सुरुवात आहे,’ अशा शब्दांत विशालने ट्रॉफी जिंकल्यानंतर आनंद व्यक्त केला होता.
-
विजेतेपद मिळवल्यानंतर या पैशांचे काय करणार याबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विशालने खुलासा केला.
-
‘बिग बॉस मराठी ३’ शोचे जेतेपद मिळाल्याचा खूप आनंद झाल्याचे विशालने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
-
‘माझं मुंबईत स्वत: घर नाही. मी अजूनही भाड्याच्या घरात राहतो. लोकल ट्रेननेच सर्वीकडे प्रवास करतो. साधेपणात माझा विश्वास आहे. मी हे पैसे माझ्या भविष्यासाठी वापरेन’ असे विशाल म्हणाला.
-
सोशल मीडियावर विशालवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विशाल निकम / इन्स्टाग्राम)
प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…