-
तुम्ही जर नव्वदच्या दशकातील असाल, तर ‘सोनपरी’ हे नाव तुम्हाला नक्कीच माहित असेल. -
२००० ते २००४ या कालावधीत स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित झालेली ‘सोनपरी’ ही मालिका लोकप्रिय होती.
-
यातील सोनपरी व फ्रुटी या भूमिका आजही प्रेक्षकांना लक्षात असतील.
-
अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने यात सोनपरी तर मराठमोळ्या तन्वी हेगडेनं फ्रुटीची भूमिका साकारली होती.
-
‘रसना’ स्पर्धेत जिंकल्यानंतर तन्वी त्यांच्या जाहिरातीत झळकली होती. तेव्हापासूनच ती प्रकाशझोतात आली.
-
‘सोनपरी’ची मालिका करत असताना ती अवघ्या दहा वर्षांची होती. आता ती ३० वर्षांची झाली आहे.
-
तन्वी आता फारच सुंदर दिसते आणि तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फोटो पाहून तुम्हालाही त्याची प्रचिती येईल.
-
तन्वीने ‘सोनपरी’सोबतच ‘शकालाका बूम बूम’ या प्रसिद्ध मालिकेतही भूमिका साकारली. तर शाहिद कपूरच्या ‘लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातही ती झळकली होती. यासोबतच ‘शिवा’ या मराठी चित्रपटातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत होती.
-
बालकलाकार म्हणून तन्वीला बरेच पुरस्कार मिळाले. २०१५ मध्ये तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. ‘धुरंधर भाटवडेकर’ हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट. यामध्ये तिने मोहन आगाशे, किशोरी शहाणे यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटातील तिचा अस्सल मराठमोळा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. (सर्व फोटो – इन्स्टाग्रामवरून साभार)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”