-
झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
-
या मालिकेतील एक लक्षवेधी व्यक्तिरेखा म्हणजे नयन कानविंदे.
-
अभिनेता अमित परब ही व्यक्तिरेखा अगदी चोख बजावतोय.
-
अमित याने एम.बी.ए. केलं आहे आणि कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहे.
-
बाबांची सरकारी नोकरी आणि आई गृहिणी असल्यामुळे घरामध्ये अभिनयाची पार्श्वभूमी नाही.
-
अमित हा जॉब करून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमध्ये काम करतोय.
-
याबद्दल बोलताना अमित म्हणाला, मी सध्या एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये कार्यरत आहे.
-
केवळ आवड असल्यामुळे मी अभिनयाकडे वळलो.
-
माझा निर्णय ऐकल्यावर आई बाबा थोडे टेन्शनमध्ये आले होते.
-
या क्षेत्रात आमच्या परिवारातील दूर दूर पर्यंत कोणी नाही.
-
हळू-हळू मला काम मिळत गेलं आणि त्यांनी माझी आवड ओळखून मला सपोर्ट केला.
-
सुरुवातीला २ वर्ष प्रयत्न करून बघ आणि काहीच नाही झालं तर पुन्हा जॉब कर असा सल्ला आधी त्यांनी मला दिला होता.
-
आवड, योगायोग आणि माझी मेहनत यामुळे २ वर्षाच्या आत मला ब्रेक मिळाल्यामुळे मी जरा रिलॅक्स झालोय.
-
लॉकडाऊन लागल्यावर मला खूप वेळ मिळाला.
-
वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला माझ्या अभिनयाच्या प्रॅक्टिससाठी देखील वेळ देता आला.
-
नयन या भूमिकेसाठी मी व्हिडीओ पाठवून ऑडिशन दिलं आणि ही भूमिका मला मिळाली.
-
प्रेक्षकांना माझं काम आवडत असल्याचं मला समाधान आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमित परब / इन्स्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन