-
सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट चर्चेत आहे.
-
या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे.
-
तर चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने आयटम सॉंग केले आहे.
-
समांथाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच आयटम साँग केले होते. तिच्या डान्सची जोरदार चर्चा झाली होती.
-
तगडी स्टार कास्ट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे.
-
चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपये कमावले आहे.
-
करोना काळात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमधील हा चित्रपट ठरला आहे.
-
पण या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने किती मानधन घेतले असेल? हे जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक आहेत.
-
चित्रपटात अल्लू अर्जुनने पुष्पा राज ही भूमिका साकारली आहे.
-
या भूमिकेसाठी त्याने जवळपास ५० कोटी रुपये मानधन म्हणून घेतल्याचे म्हटले जात आहे.
-
तर रश्मिकाने श्रीवल्ली ही भूमिका साकारली आहे.
-
तिला या भूमिकेसाठी जवळपास ८ ते १० कोटी रुपये मानधन म्हणून दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
-
चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटून गेले असले तरी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.
-
हिंदी भाषेत डब करताना त्याला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला होता.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच