-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
त्याने भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाचे सर्वत्र कौतुक केले जाते. भारताचा माजी कर्णधार म्हणूनही त्याची खास ओळख आहे.
-
सध्या तो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. राहुल द्रविडला द वॉल म्हणून ओळखले जाते.
-
आज त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक क्रिकेटपटू, नातेवाईक त्याला सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा देताना दिसत आहेत.
-
मात्र तुम्हाला माहितीये का? मराठी सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे आणि राहुल द्रविडचे खास नाते आहे.
-
मात्र तुम्हाला माहितीये का? मराठी सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे आणि राहुल द्रविडचे खास नाते आहे.
-
ती सध्या कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारत आहे.
-
या पोस्टमध्ये आपण एकाच कुटुंबातील असल्याचे मला आनंद आहे असे तिने म्हटले आहे.
-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती विनायक द्रविड असे या अभिनेत्रीचे नाव आहे.
-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून अदिती द्रविड ही प्रसिद्धी झोतात आली.
-
राहुल द्रविड हा अदितीचा काका आहे. नुकतंच तिने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
त्यापुढे ती म्हणाली, ‘आपण एकाच कुटुंबातील आहोत याचा मला अभिमान आहे’.
-
“तसेच मला आपले आडनाव फार आवडते. त्यामुळे मी कधीही ते बदलत नाही. खूप प्रेम आणि आदर,” असेही अदितीने यावेळी म्हटले आहे.
-
यासोबत तिने ही पोस्ट करताना #aditidravid #rahuldravid #thewall #love #favorite #indiancricket #bleedblue #forever” असे अनेक हॅशटॅग वापरले आहेत.
-
तिच्या या पोस्टनंतर अनेक मराठी सेलिब्रेटींनी कमेंट करत राहुल द्रविडला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील समीर परांजपे यांनी तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे. कर कर शो ऑफ कर… हा माझा काका आहे, हा माझा काका आहे. राहुल द्रविड वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे तो म्हणाला.
-
तर अभिनेता निखिलने “वाह…#काका #चुलते” असे म्हटले आहे.
-
अदिती ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नायिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
-
ती सध्या कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारत आहे.
-
यापूर्वी तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत ईशा आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत तुळसा या भूमिका साकारल्या आहेत.
Sharad Pawar : शरद पवारांची प्रतिक्रिया; “नीलम गोऱ्हेंनी केलेलं वक्तव्य मूर्खपणाचं, यापेक्षा…”