-
मकरसंक्रांत हा वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण.
-
मकरसंक्रांतीला नवविवाहिता आणि बालकांना हलव्याच्या दागिन्यांनी सजवण्याची प्रथा आहे.
-
नववधूंसाठी तर हा सण नावीन्याचा असतो.
-
बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने काही दिवसांपूर्वीच विकी जैनशी लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतर अंकिताने पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे.
-
संक्रांतीची खास काळी साडी आणि पांढऱ्याशुभ्र हलव्याचे विविध दागिने अंगावर लेवून मिरवल्याशिवाय ‘संक्रांती’चा सण साजराच होत नाही.
-
या सणाला तिळगुळाएवढेच हलव्याच्या दागिन्यांना महत्त्व आहे.
-
अंकिताने यावेळी काळी साडी आणि त्यावर हलव्याचे दागिने परिधान केले होते.
-
एरवी सोन्याच्या दागिन्यांच्या मोहात पडणाऱ्या महिलांना मकरसक्रांतीच्या सणासाठी हलव्याचेच दागिने हवे असतात.
-
नवविवाहितेसाठी तर हल्ली हलव्याचे खास दागिने बनवून घेतले जातात.
-
अंकिताने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नेटकऱ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
तिळ गूळ घ्या गोड गोड बोला! असे म्हणत तिळाचे लाडू देऊन मकर संक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते.
-
मकर संक्रांतीपासून शुभ कार्याला पुन्हा एकदा सुरूवात होते.
-
सूर्याचं मकर राशीतील संक्रमण किंवा सूर्याचे उत्तरायण यासाठी मकरसंक्रांतीचे महत्त्व मानले जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे / इन्स्टाग्राम)

‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…