बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा बराच वेळा त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसतो. तो तेथील फोटो सोशल मीडियावर देखील शेअर करत असतो. पण तुम्हाला सलमानच्या या फार्महाऊसची किंमत माहितीये का?. हा फार्महाऊस आतुन पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. लॉकडाऊनच्या काळात सलमानची बहिण अर्पिता, आयुष शर्मा, भाचा आहिल, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, लूलिया वंतूर, वलूशा डिसूजा हे फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसले होते. लूलिया, वलूशा आणि जॅकलिनने सोशल मीडियावर सलमानच्या फार्महाऊसचे फोटो शेअर केले होते. सलमानचा हा फार्महाऊस १५० एकरमध्ये आहे. सलमानच्या फार्महाऊसवर घोडे आहेत. हॉर्स रायडिंगसाठी वेगळे असे मैदान तयार केलेले आहे. अनेकदा सलमान देखील तेथे हॉर्स रायडिंग करताना दिसतो. तसेच सलमानने त्याच्या फार्महाऊसवर सायकल देखील ठेवली आहे. फार्महाऊसवर सलमानने अनेक झाडे लावली आहेत. सलमानच्या फार्महाऊसवर ट्रॅक्टर देखील आहे. लॉकडाऊनच्या काळात वलूशाने ट्रॅक्टरवर बसून फोटो शेअर केला होता. वलूशाने सलमानच्या फार्महाऊसवर असलेल्या जीपमध्ये फोटो काढला होता. तसेच जॅकलिन देखील फार्महाऊस वर वेळ घालवताना दिसली होती.content/uploads/2020/04/93380383_865251193944537_6926511597894181397_n.jpg” alt=”” data-id=”2142502″ data-full-url=”https://loksatta.com/wp-content/uploads/2020/04/93380383_865251193944537_6926511597894181397_n.jpg” class=”wp-image-2142502″/> तिने योग करतानाचे फोटो शेअर केले होते. सलमानच्या फार्महाऊवर तिन बंगले आहेत. सलमानच्या या फार्महाऊसची किंमत जवळपास ८० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. वलूशा लॉकडाउनच्या काळात सलमानच्या फार्महाऊसवर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना दिसत होती. ती दररोज नवनवीन फोटो पोस्ट करायची. सलमानच्या फार्महाऊसवर सलमान नेहमी फिरताना दिसतो. (Photo Credit: Varinder Chawla) सलमान दरवर्षी त्याचा वाढदिवस याच फार्महाऊसवर साजरा करताना दिसतो. लूलिया, वलूशा आणि जॅकलिनने सोशल मीडियावर सलमानच्या फार्महाऊसचे फोटो शेअर केले होते.
“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक