-
बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने ९० चे दशक गाजवले असे म्हणायला हरकत नाही. पण अभिनया पलीकडे तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.
-
मोनिकाचं नाव गुन्हेगारी जगाशी जोडण्यात येत होतं. ज्यावेळी तिचं नाव गुन्हेगारी जगताशी जोडण्यात आलं होतं तेव्हा ती कुठेतरी बॉलिवूडपासून लांब जाऊ लागली होती.
-
मोनिकाने ‘जोडी नंबर १’, ‘प्यार इश्क और मोहब्बत’सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले होते. पण तेव्हा प्रेक्षकांची मने ती काही जिंकू शकली नाही. दरम्यान, ती ‘बिग बॉसच्या २’ऱ्या सीजनमध्ये दिसली आणि तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली.
-
यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. ते म्हणजे, गँगस्टर अबु सालेमची गर्लफ्रेंड म्हणून तिला लोक ओळखू लागले होते. यावेळी तिला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले होते. आज मोनिकाचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही खास गोष्टी आपण जाणून घेऊया…
-
मोनिकाचा गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचे समोर आल्यानंतर तिला तुरुंगात जावे लागले होते. तिचा गुन्हेगारी जगताशी असलेला संबंधामुळे तिच्यासमोर अनेक संकंट आली होती.
-
ती बऱ्याचवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. मोनिका बेदी आणि अबु सालेमची लवस्टोरी ही वेगळ्याच प्रकारची आहे. अजुनही तिच्या चाहत्यांमध्ये तिची चर्चा असते.
-
असे म्हटले जाते की मोनिका आणि अबु सालेमने लॉस एंजेलिसमध्ये लग्न केलं होतं.
-
मोनिका आणि अबु सालेमची पहिली भेट ही दुबईत झाली होती. मोनिकाच्या सुंदरतेवर अबु सालेम फिदा झाला होता.
-
त्यानंतर त्याने मोनिकाशी संपर्क साधला आणि त्यानंतर ते फोनवर सतत बोलू लागले.
-
दरम्यान, फिल्मफेयरच्या एका मुलाखतीमध्ये मोनिकानं सांगितलं होतं की, १९९८ मध्ये दुबईतील एका शो दरम्यान माझी आणि अबु सालेमची भेट झाली होती. त्यावेळी त्यानं आपली ओळख वेगळ्या नावानं केली होती.
-
मुंबईत आल्यावर तो नेहमीच माझ्या संपर्कात राहिला. दर अर्ध्या तासाला तो मला फोन करत होता. मी अनेकदा अबु सालेमच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला, असे मोनिका म्हणाली.
-
मोनिका पुढे म्हणाली, मात्र मला यात काही यश आले नाही. मला त्याने एका हॉटेलमधून शोधले आणि परत आणले होते. लोकांना वाटत होतं की, मी अबु सालेमजवळ एका राजकुमारी सारखी राहत होती. पण मी वेगळ्या परिस्थितीत जगत होते. जिथे मला घरातली सगळी कामं करावी लागली होती. (Photo Credit : Monica Bedi Instagram)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO