-
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या एकेकाळच्या प्रेमसंबंधांची चर्चा नेहमीच होत असते.
-
अनेक वर्षे उलटली असली तरी अमिताभ, रेखा आणि जया बच्चन यांचा लव्ह ट्रँगल बॉलिवूडचा चर्चेचा विषय आहे.
-
अर्थात अमिताभ यांनी या नात्याबद्दल नेहमीच नकार दिला. परंतु अनेकदा रेखाच्या हावभावातून त्यांच्या मनात दडलेले प्रेम दिसून येते.
-
१९८४ मध्ये एका मुलाखतीदरम्यान रेखाने या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले होते.
-
या मुलाखतीत रेखांनी त्या आणि अमिताभ बच्चन नात्यात होते, याची कबुली दिली होती.
-
आपली प्रतिमा वाचवण्यासाठी आणि मुलांसाठी अमिताभ यांनी हे नाते सर्वांसमोर स्वीकारले नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे, असं रेखा म्हणाल्या होत्या.
-
तसेच लोक त्याबद्दल काय विचार करतात, हे महत्त्वाचे नाही. आमच्या दोघांमध्ये असलेल्या प्रेमाबाबत लोकांना कशाला माहित असायला हवं.
-
आम्हा दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे, ते पुरेसे आहे, लोकं काय बोलतात याचा मला फरक पडत नाही, असं त्या म्हणाल्या होत्या.
-
रेखाने सांगितले की, अमिताभ आपल्यासोबतचे नाते सार्वजनिकरित्या स्वीकारत नाहीत, याची मला पर्वा नाही.
-
जर, त्यांनी स्वतः मला असं सांगितलं असतं, तर मला नक्कीच वाईट वाटलं असतं. -
रेखा पुढे म्हणतात, “लोक मला अमिताभवर प्रेम केल्यानं वेडी, बिचारी देखील म्हणत असतील. कदाचित मीही दयेला पात्र आहे. पण अमिताभ यांचे १० लोकांशी संबंध नव्हते, ते एक चांगले व्यक्ती आहेत आणि कोणालाही दुखवू शकत नाहीत, मग जगासमोर काही बोलून ते पत्नीला कसे दुखवू शकतात.”
-
दरम्यान, आजही लोक दोघांच्या सिक्रेट अफेअरबद्दल बोलतात.
-
‘दो अंजाने’ चित्रपटादरम्यान दोघांची भेट झाली होती.
-
त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे आधीच लग्न झाले होते.
-
रेखाच्या मैत्रिणीच्या घरी दोघांच्या भेटीगाठी व्हायच्या, असं म्हटलं जातं. (संग्रहित छायाचित्रे – इंडियन एक्सप्रेस)

पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग