-
अभिनेता मिथुन चक्रवर्ती असो अथवा आदित्य पांचोली या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. परंतु त्यांच्या मुलांना मात्र बॉलिवूडमध्ये छाप पाडता आली नाही.
-
वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी न मिळालेल्या स्टारकिड्स बद्दल जाणून घेऊया.
-
अभिनेता राज बब्बरचा मुलगा आर्य बब्बर याने २००२ साली ‘अब के बरस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याने ‘बंगिस्तान’, ‘जोकर’, ‘डेंजरस इश्क’, ‘तीस मार खान’, ‘जेल’ आणि ‘गुरु’ या चित्रपटांत देखील काम केलं. परंतु आर्यला वडील राज बब्बर यांच्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडता आली नाही.
-
आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोलीला देखील बॉलिवूडमध्ये विशेष कामगिरी करता आली नाही. २०१५ साली सुरजने ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
सुपरस्टार मिथुन चक्रवतींना कोण ओळखत नाही. अभिनय शैलीने त्यांनी बॉलिवूडमध्ये छाप तर पाडलीच शिवाय प्रेक्षकांची मनं देखील जिंकून घेतली. मिथुन चक्रवर्ती यांचे लाखो चाहते आहेत. परंतु त्यांचा मुलगा महाअक्षय याला मात्र बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करता आलं नाही.
-
अभिनेता तुषार कपूरला तुम्ही ‘गोलमाल’, ‘क्या कूल है हम’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘कुछ तो है’, ‘ढोल’ या चित्रपटांतून भूमिका साकारताना पाहिलं असेल. परंतु तुषार कपूरला वडील जितेंद्र कपूर यांच्यासारखी प्रसिद्धी मिळाली नाही.
-
अभिनेता हैरी बावेजा यांचा मुलगा हरमन बावेजाला देखील बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यात असमर्थ ठरला.
-
‘फूल’, ‘जनम’, ‘तेरी कसम’, ‘लव्ह स्टोरी’ अशा हिट झालेल्या चित्रपटांत अभिनेता कुमार गौरव यांनी काम केलं आहे. अभिनेता राजेंद्र कुमार यांचे ते पुत्र आहेत. अनेक हिट चित्रपट देऊनसुद्धा कुमार गौरव यांना वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये छाप पाडता आली नाही.
-
मुंबई पोलिसमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कारभार सांभाळलेले अभिनेते राज कुमार यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. परंतु त्यांचा मुलगा पुरु राज कुमार याला मात्र बॉलिवूडमध्ये विशेष कामगिरी करता आली नाही.
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”