-
काही दिवसांपूर्वी सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-द राइज‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
-
तसेच या चित्रपटाचे संवाद आणि गाणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा’ या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले.
-
हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जुनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.
-
अल्लू अर्जुनने श्रेयसचे कौतुक करत आभार देखील मानले होते. दरम्यान, अल्लू अर्जूनला तर श्रेयस तळपदेने आवाज दिलाय. पण बाकी कलाकारांनी कोणी आवाज दिलाय हे तुम्हाला माहितीये का, चला तर जाणून घेऊया..
-
व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट स्मिता रोजमेयरने अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या श्रीवल्लीच्या पात्रासाठी आपला आवज दिला.
-
बॉलिवूड अभिनेता साहिल वैद्यने अल्लू अर्जुनच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार्या तेलुगू चित्रपट अभिनेत्याला आपला आवाज दिला आहे.
-
फहाद फासिल हा अभिनेत्याने चित्रपटात मुख्य खलनायक म्हणजेच आयपीएस अधिकारी भैरोसिंग शेखावत यांची भूमिका साकारली आहे. त्यांना अभिनेता राजेश खट्टर यांनी आपला आवाज दिलाय.
-
या चित्रपटात मंगलम श्रीनूची भूमिका अभिनेता सुनील यांनी साकारली आहे. त्यांना कलाकार उदय सबनीस यांना आवाज दिला आहे.
-
अभिनेता धनंजय याने या चित्रपटात जॉली रेड्डीची भूमिका साकारली आहे. त्याला अभिनेता मनोज पांडेने आपला आवाज दिला आहे.
-
राजेश जॉली यांनी कोंडा रेड्डीची भूमिका साकारणारा अभिनेता अजय शाहला आपला आवाज दिला आहे.
-
सबिना मौसम यांनी मंगलम श्रीनूची पत्नी दाक्षायणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अनुसुया भारद्वाज यांच्या पात्राला आपला आवाज दिला आहे.
-
पुष्पा चित्रपट रिलीज होऊन बरेच दिवस झाले असले तरी हा चित्रपट अजूनही धुमाकूळ घालतोय. (फोटो सौजन्य – संग्रहित)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”