-
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ही तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मौनीने बॉयफ्रेंड सूरज नांबियारशी लग्ना केले. मौनीने गोव्यात लग्न केले.
-
त्यांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी आणि जवळच्या मित्र-परिवाराने हजेरी लावली होती. दरम्यान, सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
-
आता मौनीच्या चाहत्यांना तिचा नवरा सूरज कोण आहे? त्याची संपत्ती किती आहे? असे अनेक प्रश्न पडले आहेत. चला तर आज आपण मौनीचा पती सूरजच्या संपत्ती विषयी जाणून घेऊ या.
-
मौनीचा नवरा सूरजचा जन्म कर्नाटकमधील बेंगळुरूत जैन कुटुंबात झाला. सूरजचं प्राथमिक शिक्षण जैन इंटरनॅशनल शाळेत झालं आहे.
-
तर २००८ मध्ये त्यानं बेंगळुरूच्या आरव्ही इंजिनीअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनीरिंग पूर्ण केलं.
-
सूरज हा दुबईत राहणारा भारतीय व्यापारी आणि बँकर आहे.
-
दरम्यान, मौनीने मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतलं आहे. पण अभिनयात करिअर करण्याची इच्छा असल्याने तिने शिक्षण पूर्ण केलं नाही आणि अभिनय क्षेत्राकडे वळली.
-
२००७ मध्ये मौनीने छोट्या पडद्यावर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ य मालिकेतून पदार्पण केले.
-
त्यानंतर २०११ मध्ये मौनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
मौनीला खरी ओळख ‘महादेव’ आणि ‘नागिन’ या मालिकेतून मिळाली आहे. मौनी वर्षभरात १ ते २ कोटी रुपये कमवते.
-
तर तिची एकूण संपत्ती ही १० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे म्हटले जाते.
-
तर दुसरीकडे सूरज बॅंकर असल्याने त्याची संपत्तीही तेवढीच आहे. तिचा पती सूरजची एकूण संपत्ती ही ५० कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : Mouni Roy Instagram)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार