-
‘गँग्स ऑफ वासेपुर’, ‘मंटो’, ‘ठाकरे’, ‘किक’ अशा चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या कसदार अभिनयाची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी.
-
आज कलाविश्वात नवाजुद्दीनच्या नावाचं एक वेगळं वलय तयार झालं आहे.
-
नवाजुद्दीनने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत त्याच्यातील अभिनयकौशल्य सादर केलं आहे.
-
नवाजुद्दीन सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
-
नवाजुद्दीनने मुंबईत नवे घर खरेदी केल्याचे समोर आले आहे.
-
या आलिशान घरासोबतचा फोटो स्वत: नवाजुद्दीनने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
नवाजुद्दीनचे हे घर मुज्फ्फरनगर येथील बुढानामधील घरासारखे असणार आहे.
-
नवाजुद्दीनने या नव्या घराचे नाव वडीलांच्या नावावरुन ‘नवाब’ असे ठेवले आहे.
-
नवाजुद्दीनच्या वडीलांचे नाव ‘नवाबुद्दीन सिद्दीकी’ असे आहे.
-
नवाजुद्दीनने या नव्या आलिशान बंगल्याला चारही बाजूने पांढरा रंग दिला आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार नवाजुद्दीन कडे एकूण १५० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
-
नवाजुद्दीन दर महिन्याला १ कोटी रुपये कमवतो.
-
नवाजुद्दीनने आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं असून सिक्रेड गेम्स ही त्याची वेब सीरिज विशेष गाजली.
-
नवाजुद्दीन सध्या अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘टीकू वेड्स शेरु’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नवाजुद्दीन सिद्दीकी / इन्स्टाग्राम)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली