-
अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती हासन.
-
श्रुती दाक्षिणात्य सुपरस्टार आणि नेते कमल हासन व सारिका यांची मुलगी आहे.
-
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
सध्या श्रुती शांतनू हजारीकाला डेट करत आहे.
-
तिने एका शोमध्ये प्रेमाची कबुली दिली होती.
-
त्यावेळी तिला शांतनूसोबत असलेले नाते इतरांपासून लपवायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता.
-
त्यावर उत्तर देत की म्हणाली, ‘मी भूतकाळात अनेक गोष्टी लपवल्या आहेत.
-
मी प्रत्येक वेळी सिंगल आहे असे सांगायचे. पण मी हे कुणासाठी करते असा प्रश्न मला पडायचा.’ त्यामुळे आता ती तिच्या नात्याबद्दल जाहीरपणे बोलत असते.
-
सध्या शांतनू हजारीकाला डेट करणाऱ्या श्रुतीला तिच्या पूर्वीच्या ब्रेकअपमुळे दारूचे व्यसन जडले होते.
-
तिचा बॉयफ्रेंड विदेशातला होता. एका मुलाखतीत तिने याबद्दल खुलासा केला होता.
-
प्रेमात धोका मिळाल्यामुळे श्रुती डिप्रेशनमध्ये गेली आणि तिला दारूचे व्यसन लागले होते.
-
श्रुती हसनचे नाव परदेशी मायकल कोर्सलसोबत जोडले गेले होते.
-
२०१६पासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते, पण २०१९ मध्ये ते वेगळे झाले.
-
श्रुती हासनने एका मुलाखतीत सांगितले होते की, ब्रेकअपनंतर ती खूपच तुटली होती आणि तिला दारूचे व्यसन जडले होते.
-
त्यामुळे तिच्या करिअरलाही मोठा फटका बसला. मात्र, वेळीच स्वत:ला सावरल्याचं ती म्हणाली होती.
-
मायकलपासून वेगळे झाल्यानंतर श्रुतीने सांगितले की, हा तिच्यासाठी चांगला अनुभव होता.
-
या नात्यात तिला खूप काही शिकायला मिळाले. ती नेहमीच चांगल्या आणि खऱ्या प्रेमाच्या शोधात होती.
-
श्रुतीचे नाव कधी रणबीर कपूरसोबत, कधी सामंथा रुथ प्रभूचा माजी पती नागा चैतन्यसोबत तर कधी सुरेश रैनासोबत जोडले गेले आहे.
-
दरम्यान, आता श्रुती ओटीटीवरील बेस्टसेलर वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
-
या सीरिजमध्ये तिच्यासोबत अभिनेते मिथुन चक्रवर्ती देखील दिसणार आहे.
-
ही वेबसीरिज १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
अमेझॉन प्राईमवर ही सीरिज पाहता येणार आहे.
-
यामध्ये श्रुतीसह गौहर खान, अर्जन बाजवा, सत्यजीत दुबे आणि सोनाली कुलकर्णी दिसणार आहेत.
-
श्रुती तिचा बॉयफ्रेंड शांतनू हजारिकासह (फोटो – सोशल मीडियावरून साभार)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”