-
अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूक आणि ग्लॅमरमुळे जास्त चर्चेत असते. यावेळी उर्वशीने एक महत्वाचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
-
अरब फॅशन वीकमध्ये सहभागी होणारी उर्वशी रौतेला ही पहिली भारतीय आहे. एक नव्हे तर ती तब्बल दोन वेळा या फॅशन वीकमध्ये सहभागी झाली आहे.
-
अभिनेत्री उर्वशी रौतेला अरब फॅशन वीकमध्ये शो स्टॉपर होती. तिची स्टाईल, लूक आणि महत्वाचं म्हणजे तिचा आत्मविश्वास पाहून सर्वच लोक थक्क झाले होते.
-
तिच्याविषयीच्या चर्चेचं महत्त्वाचं कारण म्हणजे उर्वशीने या शो दरम्यान जो ड्रेस परिधान केला होता त्याने सोन्यापासून बनवण्यात आला होता.
-
उर्वशी रौतेलाच्या या सोन्याची ड्रेसची किंमत तब्बल ४० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
-
उर्वशी रौतेलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या गोल्ड ड्रेसची झलक पाहायला मिळत आहे.
-
डोक्यापासून पायापर्यंत उर्वशी सोन्याने मढवल्यासारखी दिसत आहे.तसेच अभिनेत्री डोक्यावर परिधान केलेले आभूषण हिरे आणि मोत्यांनी तयार करण्यात आले होते.
-
उर्वशी रौतेलाचा हा खास पोशाख डिझायनर फर्ने वन अमॅटोने डिझाईन केला आहे. याआधीसुद्धा उर्वशीने अनेक महागडे पोशाख परिधान केले आहेत. तिने वर्साचे बेबीच्या गाण्यात घातलेल्या ड्रेसचीसुद्धा प्रचंड चर्चा झाली होती. परंतु हा ड्रेस सर्वात महागडा असल्याचं दिसून येत आहे.
-
उर्वशी रौतेला अलीकडच्या काळात मिस युनिव्हर्स 2021 मध्ये परीक्षक म्हणून सहभागी झाल्यामुळे चर्चेत होती. तर आता इथेही उर्वशीने आपल्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख