-
‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. इतर सीजन प्रमाणेच बिग बॉस हिंदीचं १५वं पर्व देखील चांगलंच गाजलं.
-
रविवारी बिग बॉसच्या १५व्या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडला.
-
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या बिग बॉस हिंदीच्या १५ व्या पर्वाची विजेती ठरली. बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणारी तेजस्वी प्रकाश आठवी महिला ठरली आहे.
-
याआधी कोणकोणत्या अभिनेत्रींनी बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली, यावर एक नजर टाकूया.
-
बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची विजेती ठरलेली अभिनेत्री श्वेता तिवारी ही बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणारी पहिली महिला ठरली.
-
श्वेता तिवारीला बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतच एक करोड रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले होते.
-
यानंतर अभिनेत्री जुही परमारने बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी आपल्या नावावर केली.
-
बिग बॉसच्या सहाव्या पर्वाची विजेती देखील महिलाच होती.
-
अभिनेत्री उर्वशी ढोलकीया बिग बॉसच्या सहाव्या पर्वाची विजेती ठरली होती.
-
बिग बॉसच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या पर्वाबरोबरच आणखी एका अभिनेत्रीने सातव्या पर्वाची ट्रॉफी नावावर केली.
-
अँकर, मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेती ठरली.
-
अभिनेत्री शिल्पा शिंदे बिग बॉसच्या अकराव्या पर्वाची विजेती ठरली होती.
-
शिल्पा शिंदेला ट्रॉफीसोबत ५० लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले होते.
-
बिग बॉसच्या १२व्या पर्वाच्या ट्रॉफीवर अभिनेत्री दिपीका कक्करने नाव कोरलं होतं.
-
बिग बॉसची ट्रॉफी आणि ३० लाख रुपये तिला बक्षीस म्हणून मिळाले होते.
-
सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनतेरी रुबीना दिलैक बिग बॉसच्या १४व्या पर्वाची विजेती ठरली होती.
-
रुबीनाला ३६ लाख रुपये आणि बिग बॉसच्या १४व्या पर्वाची ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली होती.
-
बिग बॉसच्या १५व्या पर्वाची विजेती ठरत अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आता या महिलांच्या पंगतीत जाऊन बसली आहे. तेजस्वी प्रकाशला ट्रॉफीसोबत ४० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश