-
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाने अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. रवीनाचे लाखो चाहते आहेत.
-
दरम्यान, ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यातून रवीनाने सगळ्यांची मने जिंकली होती. या सुपरहिट चित्रपटानंतर सगळीकडे अक्षय आणि रवीना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
-
पण एकवेळी अशी आली होती की त्या दोघांमध्ये मतभेद होऊ लागले आणि ते विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या.
-
ब्रेकअपनंतर रवीना डिप्रेशनमध्ये गेली होती आणि त्याविषयी रवीनाने एका मुलाखतीत खुलासा केला होता.
-
रवीना म्हणाली, ‘त्या काळात तिला घरी राहण्याची इच्छा नसायची. त्यामुळे ती अनेकदा घराबाहेर पडायची. तेव्हा एक दिवस रात्री रवीना तीनच्या सुमारास मुंबईच्या रस्त्यावर फिरत होती.’
-
त्यावेळी तिची नजर ही झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेवर पडली. तिचा नवरा तिच्याशी भांडत होता आणि मारहाण करत होता.
-
रवीना पुढे म्हणाली, “ती महिला रडू लागली, त्यानंतर तिचं मूल त्या दोघांमध्ये आलं आणि काही वेळातच ती महिला तिच्या मुलासोबत रस्त्यावर खेळू लागली. त्यावेळी त्या महिलेकडे पाहून वाटत नव्हते की ती नुकतीच दु:खी होती.”
-
हे पाहिल्यानंतर रवीनाचे आयुष्य बदलले असे ती म्हणाली, ‘एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने मला इतके दुःख का झाले? आपल्या मुलासोबत खेळणाऱ्या या महिलेकडे ना घर आहे ना कोणत्या सुख-सुविधा आहेत.’
-
पुढे रवीना म्हणाली, ‘तरीही ती किती धैर्याने सगळ्या गोष्टींना तोंड देते. दुसरीकडे माझ्याकडे सगळं आहे. कोटींचे घर आहे, महागडी गाडी आहे, नोकर-चाकर आहेत. त्या दिवसापासून माझे नवीन आयुष्य सुरू झाले आणि मी मागे वळून पाहिले नाही.’
-
रवीना पुढे म्हणाली की, “या क्षणी तिने निर्णय घेतला की आता भूतकाळातील सगळ्या गोष्टी विसरून आयुष्यात पुढे जायचे.”
-
दरम्यान, रवीनाने अनिल थडानी या फिल्मडिस्ट्रीब्यूटरशी २००४ मध्ये लग्न केले.
-
तर अक्षय कुमारने २००१ मध्ये बॉलिवूड अभिनेता राजेश खन्ना यांची लाडकी लेक आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केले. (All Photo Credit : File Photo)

Maharashtra News LIVE Updates : “होय डॉक्टरांनी डिपॉझिट मागितले होते”, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची कबुली; म्हणाले, “त्या दिवशी…”