-
हॉटस्टार, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सने सगळ्यांनाच वेड लावलंय. मोठ्या पडद्यावरील सुपरस्टार्सला देखील ओटीटी प्लॅटफॉर्म्सने भुरळ घातलीये.
-
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करून चाहत्यांना सुखद धक्का दिला.
-
आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगण देखील लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे.
-
‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमधून अजय देवगण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असून या सीरिजच्या माध्यमातून अजय देवगणसोबतच बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल देखील ओटीटीवर पदार्पण करणार आहे.
-
तब्बल १५ वर्षांनंतर अजय देवगण आणि ईशा देओल एकत्र काम करताना दिसणार आहेत.
-
अजय देवगण आणि ईशा देओलने अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे.
-
परंतु लग्नानंतर ईशा देओलने करिअरमध्ये ब्रेक घेतल्यामुळे ती बॉलिवूडपासून दूर होती.
-
‘मै ऐसा ही हू’, ‘युवा’, ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटांतील अजय देवगण आणि ईशा देओल यांच्या जोडीला विशेष पसंती मिळाली होती.
-
‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमधून पुन्हा एकदा ही जोडी पडद्यावर दिसणार आहे. ही वेब सीरिज ‘लूथर’ या वेब सीरिजचा रिमेक आहे.
-
या वेब सीरिजमध्ये अजय देवगण साहसी पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
अजय देवगण आणि ईशा देओलसोबतच आशिष विद्यार्थी, अश्विनी कळसेकर, अतुल कुलकर्णी हे कलाकारदेखील या वेब सीरिजमध्ये झळकणार आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल