-
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागाचैतन्य हे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
समांथा आणि नागाचैतन्य यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांनी वेगळं होत असल्याचे जाहीर केले.
-
त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. या दोघांनी घटस्फोट का घेतला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
-
मात्र वेगळे झाल्यानतंर समांथा आणि नागाचैतन्य एकमेकांशी जोडलेले पाहायला मिळत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे समांथाच्या शरीरावर असणारे टॅटू.
-
‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम साँगमुळे प्रचंड चर्चेत असलेल्या समांथाच्या शरीरावर तीन टॅटू आहेत.
-
समांथाला टॅटूची प्रचंड आवड आहे. तिच्यासाठी हे टॅटू खास असून त्याचा अर्थ प्रचंड वेगळा आहे.
-
समांथाने नागाचैतन्यप्रमाणे तिच्या मनगटावर एक टॅटू काढला आहे. या टॅटूमध्ये दोन बाण दिसत आहेत.
-
हा टॅटू एक रोमन चिन्ह आहे. ‘स्वतःची ओळख स्वत: बनवा’, असा या टॅटूचा अर्थ आहे.
-
यानंतर समांथाच्या पाठीवर मानेच्या अगदी खाली एक टॅटू पाहायला मिळत आहे. यात YMC अशी तीन अक्षरे टॅटू म्हणून दिसत आहेत.
-
YMC या टॅटूचा संबंध नागा चैतन्यशी आहे. हा टॅटू ‘ये माया चेसावे’ चित्रपटाशी संबंधित आहे.
-
समांथासाठी हा चित्रपट खूप खास आहे. कारण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नागा चैतन्य आणि तिची पहिल्यांदा भेट झाली होती.
-
समांथाचा तिसरा टॅटू हा तिच्या कमरेजवळ आहे. यात तिने ‘Chay’ असे लिहिले आहे.
-
हा टॅटूही नागाचैतन्यशी संबंधित असून तिने त्यावर त्याचे टोपणनाव लिहिले आहे.
-
समांथा आणि नागा चैतन्य यांनी २०१० मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.
-
ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख