-
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं काल ६ फेब्रुवारी रोजी निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. (छायाचित्र सौजन्य प्रशांत नाकवे)
-
लतादीदींचा आवजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. फक्त भारतीयंच नाही तर परदेशातही त्यांचे लाखो चाहते आहेत.
-
त्यांच्या जाण्यानंतर आता फक्त त्यांचा गोड आवाज आपल्यासोबत सदैव राहील.
-
लतादीदी कोटींच्या मालकिन असूनही अतिशय साधारण जीवन जगत होत्या हे आपल्या सगळ्यांना माहित आहे.
-
बॉलिवूडमध्ये आल्यानंतर लतादीदींनी फक्त लोकांचे प्रेम नाही तर संपत्तीही कमावली. तर रिपोर्टनुसार असे म्हटले जाते की लतादीदींची एकूण संपत्ती ही ३७० कोटी रुपये आहे.
-
लता मंगेशकर या मुंबईतील उच्च भ्रू वस्तीत पेडर रोड या परिसरात राहत होत्या. त्या ‘प्रभुकुंज भवन’ या सोसायटीत राहत होत्या.
-
लतादीदींच्या घराची किंमत ही कोटींमध्ये आहे.
-
लतादीदींना सुंदर साड्यांसोबत दागिन्याची आवड होती. त्या अनेकदा त्यांच्या पांढऱ्या साड्यांमुळे चर्चेत असायच्या.
-
लतादीदींना पांढरा रंग प्रचंड आवडत होता. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “त्या लहान असताना सुद्धा जेव्हा घाघरा चोली परिधान करायच्या तेव्हा ते सगळे पांढऱ्या रंगाचेच असायचे.”
-
त्यांना पांढरा रंग इतका आवड होता की बऱ्याचवेळा केसांमध्ये पांढऱ्या रंगाचे फूल घालायच्या.
-
लतादीदींना गाड्यांवर प्रचंड प्रेम आहे. त्यांच्याकडे मर्सिडीज बेंज, क्रिसलर, ब्यूक, शेवरले या कंपन्यांच्या गाड्या होत्या.
-
लतादीदींनी त्यांच्या करिअरमध्ये ३० हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.
-
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती.
-
काल लतादीदींवर मुंबईतील दादर परिसरात असलेल्याशिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

…म्हणून कुणालाच कमी समजू नका! शिकारीसाठी आलेल्या वाघाचा माकडाने केला मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video